🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट हेडलाईन्स बातम्या.....!


🌟इंडिया आघाडीचा राजकीय भुकंप फसला तर राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पदावर वर्णी🌟 

✍️ मोहन चौकेकर

* पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जुन रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, परदेशातील अनेक पंतप्रधान, राष्ट्रपती , परदेशातील प्रसिद्ध व गणमान्य व्यक्ती यांच्यासह देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती, उद्योगपती, गणमान्य व्यक्तीसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य  शपथविधी सोहळा पार पडणार

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मंत्रीमंडळात महाराष्ट्रातुन  भाजपाचे नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे यांच्यासह पराभुत झालेल्या पंकजा मुंडे व नवनीत राणा यांची देखील वर्णी लागण्याची शक्यता

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाव्य मंत्रीमंडळात शिवसेनेच्या एकनाथ  शिंदे गटाचे चौथ्यांदा खासदारपदी निवडून आलेले बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह, रवींद्र वायकर व श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागणार

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाव्य मंत्रीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची देखील वर्णी लागणार

* इंडिया आघाडी चंद्राबाबू नायडू व नितीशकुमार यांच्याशी पुन्हा संपर्कात काही राजकीय भुकंप होणार का याकडे देशवासियांचे लक्ष

* इंडिया आघाडीचा राजकीय भुकंप फसला तर राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पदावर वर्णी लागणार

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा  राजीनामा देण्याच्या विषयावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी  दिल्लीत दाखल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या विषयावर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी देखील केली चर्चा

* पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला तयार : चंद्राबाबू नायडू पक्षाला चार तर नितीश कुमारांच्या जे़डीयूला तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता माजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान व माजी पंतप्रधान देवगोडा यांच्या पक्षाला देखील मंत्रीपद मिळणार 

* नवनीत राणा आणि रवी राणांना तातडीनं दिल्लीला येण्याचा निरोप, भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे निर्देश, आज रात्री उशिरा दिल्लीला पोहोचणार नवनीत राणा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मंत्रीमंडळात मंत्रीपदी वर्णी लागणार

* मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरू, बैठकीला अनेक आमदार गैरहजर, लोकसभेतील पराभवानंतर नाराज आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा ; कोणताही आमदार पक्ष सोडून शरद पवार गटात जाणार नसल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

* भाजपला संपवायचं असल्यास विधानसभेत काँग्रेसला झुकतं माप मिळालंच पाहिजे : नाना पटोलेंचं मोठं विधान...काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंची लाडूतुला.

* सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील काँग्रेससोबतच राहणार,नवी दिल्लीत घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट

* शिवसेनेसोबत माझा प्रासंगिक करार मविआचे खासदार कल्याण काळेंची भेट घेणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या : दानवेंच्या पराभवावरुनही सत्तारांचा मिश्किल टोला

* निवडणुकीच्या काळात किरण सामंतांनी ठाकरेंची भेट घेतली तर सामंतांच्या मतदारासंघात अपेक्षित लीड मिळला नाही : भाजपच्या निलेश राणेंचे गंबीर आरोप तर सामंतांचंही प्रतिउत्तर

* नारायण राणे सहकुटुंब राज ठाकरेंच्या भेटीला : लोकसभेतील विजयानंतर राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे शिवतीर्थवर

* बारामतीतल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन*

* अभिनेत्री व नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला महिला अंगरक्षकाने लगावली कानशिलात,विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या