🌟पुर्णा शहरातील शहीद भगतसिंग चौकात मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती....!


🌟नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ लक्ष देतील काय ? सामाजिक कार्यकर्ते राजु नारायणकर यांचा संतप्त सवाल🌟 


पुर्णा (दि.०६ जुन २०२४) - पुर्णा शहरात एकीकडे अनेक भागातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असतांना दुसरीकडे मात्र शहरातील शहीद भगतसिंग चौक परिसरात शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असतांना नगर परिषद प्रशासनासह मुख्याधिकारी युवराज पौळ निद्रिस्त अवस्थेत आहे की काय ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते राजु नारायणकर यांनी केला आहे.

पुर्णा नदीपात्रातून पाणीपुरवठा विभागातील वाटर फिल्टरला जोडलेली मुख्य पाईपलाईन शहीद भगतसिंग चौकात फुटल्याने हजारो लिटर पाण्याची गळती होऊन सदरील पाणी रस्त्यावर साचत असतांना नगर परिषद पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह मुख्याधिकारी युवराज पौळ याकडे का दुर्लक्ष करीत आहेत ? असाही प्रश्न राजु नारायणकर यांनी उपस्थित केला असून नगर परिषद मुख्याधिकारी पौळ यांनी या फुटलेल्या पाइपलाइनची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना द्यावेत अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या