🌟पोहण्याचा छंद बेतला जिवावर ; तिघांना गमवावा लागला जीव.....!


🌟वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट धरणा मधील दुर्दैवी घटना🌟


 
फुलचंद भगत

वाशिम :- ईदचा सण असल्याने सुट्टी होती त्यामुळे मिञ धरणावर पोहायला गेले पण हा पोहण्याचा छंद तिघांच्या जीवावर बेतल्याने तिघांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे परिसरात शोककळा पसरली.दि.१७ जुन रोजी कारंजा शहरातील पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पिंपरी फॉरेस्ट येथील धरणामध्ये गेले असता तीन युवक धरणामध्ये बुडाल्याची घटना दिनांक १७ जून रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली. 


              सविस्तर असे की कारंजा शहरातील भारती पुरा भागामध्ये राहात असलेले खान व १९ वर्ष,सहीम शेक करीम शेख, वय सतरा वर्ष व इस पान अली हर्षद अली वय १५ वर्ष सर्व राहणार भारतीपुरा येथील रहिवासी असून बकरी ईदची सुट्टी असल्याने पोहन्याचा आनंद घेण्यासाठी हे तिघे मित्र पिंपरी फॉरेस्ट येथे गेले. सदर तिघे धरणामध्ये बुडाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी बुडालेल्या मुलांचा शोध घेणे सुरू केले, व तीन मुलांना धरणातून बाहेर काढले,असता तिघेही मृत आढळून आले. त्यामुळे त्या तिघांना शव विच्छेदनासाठी कारंजा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे आणले. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या