🌟मराठा सेवा संघ बुलढाणा जिल्हा कार्यालयाचे धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न.....!


🌟या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे संस्थापक माननीय पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले🌟

✍️ मोहन चौकेकर                                                                

बुलढाणा : बुलढाणा शहरातील एकता नगरमध्ये 14 जुन 2024 रोजी मराठा सेवा संघ कार्यालयाचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर  संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे संस्थापक माननीय पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.


मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष रविकांत काळवाघे यांनी बुलढाणा शहरात मराठा सेवा संघाचे एक भवन व्हावे अशी इच्छा आपल्या भाषणामध्ये बोलताना व्यक्त केली यावेळी त्या ठिकाणी धर्मवीर आमदार  संजुभाऊ गायकवाड यांनी तात्काळ मराठा सेवा संघाच्या भवनसाठी 1 कोटी व मुलामुलींचे वसतिगृह बांधकामासाठी 3 कोटी रुपयांचा निधी येणाऱ्या काळात उपलब्ध करून सुसज्ज व सर्व सोईयुक्त भवन व वसतिगृह बांधून देऊ असा शब्द यावेळी उपस्थित मराठा सेवा संघाच्या परिवारातील सदस्यांना दिला व मार्गदर्शन केले.

यावेळी या  कार्यक्रमाला  पत्रकार अजय बिल्लारी,योगेश परसे, विजय राऊत,सेवा संघाचे पदाधिकारी यांच्यासह असंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या