🌟राज्यसभेच्या १० रिक्त जागांवर लोकसभा निवडणुकीत हारलेल्या महाराष्ट्र/तामिळनाडू/तेलंगणातील नेत्यांची वर्णी लागेल काय ?


🌟लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या दिग्गज नेत्यांचे भाजप राजकीय पुनर्वसन करणार काय🌟

✍🏻विशेष वृत्त - चौधरी दिनेश (रणजित) 

देशातील नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जवळपास २४० जागा निवडून आल्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले अश्या अनेक दिग्गज नेत्यांना पक्ष नेतृत्वासह सत्तेची सुत्रधारांनी घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे पराभव पत्करावा लागला यात तामिळनाडू राज्यात भारतीय जनता पक्षाची पालमूळ रुजवणारे व कोयंबटूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले आयपीएस अधिकारी के.अण्णामलाई भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपिनाथ मुंडे यांची कन्या राज्याच्या माजी मंत्री ज्यांचा बिड लोकसभा मतदार संघातील अटीतटीच्या लढतीत पराभव झाला त्या पंकजाताई मुंडे,तेलंगणा राज्यातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम पक्षाचे अध्यक्ष अससोद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा निवडणुक लढवलेल्या माधवी लता,सतत आठ वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्या मनेका गांधी,माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी,माढा लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा अजित पवार यांच्या राजकीय भविष्यासाठी बळीचा बकरा बनवून परभणी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिलेले पराभूत उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना राज्यसभेवर पाठवून भारतीय जनता पार्टी त्याचे राजकीय पुनर्वसन करेल काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून माढा लोकसभा मतदारसंघात सुप्रीयाताई सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना बिनविरोध राज्यसभेवर घेण्यात आल्याचे समजते मग राज्यसभेच्या रिक्त झालेल्या १० जागांवर संबंधित नेत्यांना संधी का नाही ? लोकसभा  निवडणुकीत खासदारांच्या विजयामुळे राज्यसभेच्या १० जागा रिक्त झाल्या असून या जागांवर लवकरच पोटनिवडणूक होणार त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे १० पैकी सर्व १० जागा एनडीएकडे जाण्याची शक्यता आहे, कारण या राज्यांमध्ये एनडीएची सरकारे आहेत.  महाराष्ट्रात आणखी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.  तोही एनडीएच्याच वाट्याला जाईल.

देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या राज्यसभेतील १० पैकी सात खासदार एकट्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत यामध्ये महाराष्ट्रातील उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल,त्रिपुरातील विप्लव देव,मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया,बिहारमधील विवेक ठाकूर,आसाममधील कामाख्या प्रसाद ताशा आणि सर्बानंद सोनवाल यांचा समावेश आहे भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा या सर्व जागा स्वतःकडे ठेवणार असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.याशिवाय राजस्थान काँग्रेसचे केसी वेणुगोपाल यांची जागाही भाजपकडे जाणार आहे बिहारमध्ये आरजेडीच्या मिसा भारती यांनी सोडलेली राज्यसभेची जागाही आता एनडीएकडे जाणार आहे ही जागा जेडीयूकडे जाऊ शकते हरियाणा राज्यातील काँग्रेस पक्षाचे दिपेंद्र हुडा लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्याने राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाल्याने त्यांना ही जागा रिकामी होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील आणखी एका राज्यसभेच्या जागेच्या पोटनिवडणुकीत फक्त एनडीएचाच विजय होईल प्रफुल्ल पटेल यांचा मागील कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती नंतर प्रफुल्ल पटेल पूर्ण मुदतीच्या जागेवरून निवडून राज्यसभेवर आले या जागेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचा विजयही जवळपास निश्चित आहे उदयनराजे भोसले यांची रिक्त झालेली जागा अजित पवार यांच्याकडेही जाऊ शकते, कारण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने राष्ट्रवादीपेक्षा एक जागा जास्त घेतली होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या