🌟छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन.....!


🌟या शिबिरामध्ये दहावी व बारावी नंतर काय ? भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी🌟

परभणी (दि.14 जुन 2024) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथरी, मानवत, सोनपेठ यांचे संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथरी येथे दि. 20 जून  रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये दहावी व बारावी नंतर काय ? भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, मुलाखतीची तयारी, व रोजगाराच्या संधी आदी विषयावर महेश पाटील, डॉ. जाधव,  सहा. आयुक्त कौशल्य विकास व इतर तज्ञ मार्गदर्शकाकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शैक्षणिक व स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासनाच्या योजना, बँक, वित्तीय संस्था, महामंडळे यांच्या प्रतिनिधीमार्फत विविध योजनांची माहिती करून देण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व वि‌द्यार्थी व पालकांनी सदर करिअर शिबिरात सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पाथरी शासकीय औद्यो गिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सी. सी. देशपांडे यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या