🌟शिवराज्यभिषेक दिनानिमित्य भव्य रक्तदान शिबीर संपन्न....!


🌟भव्य रक्तदान शिबिरामध्ये 110 रक्तदात्यांनी केले रक्तदान🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन व स्व.प्रकाश दादा डहाके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज दि.06 जून रोजी अखंड राजा शिवछत्रपती परिवार अमरावती/ वाशिम विभाग व सरकार ग्रुप कारंजा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कारंजा लाड गुरु मंदिर संस्था कार्यालयामध्ये करण्यात आले होते

                   कारंजा लाड गुरु मंदिर संस्थांच्या हॉल मध्ये या शिबिरामध्ये 110 रक्तदातांनी रक्तदान केले.या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती श्रीमती सईताई डहाके, प्रमूख पाहुणे म्हणून तहसीलदार  कुणाल झाल्टे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, डॉ. अजय कांत, देवव्रत डहाके, श्री गुरुमंदिर संस्थान विश्वस्त निलेश घुडे, बाबासाहेब पारसकर,अविनाश खेडकर, रमेश देशमुख, प्रज्वल गुलालकरी, अतुल दरेकार, सरकार ग्रुपचे अध्यक्ष विक्की चौधरी, राजा शिवछत्रपती परिवार अमरावती/वाशिम चे अध्यक्ष निलेश पारे हे उपस्थित होते. रक्तदातांना प्रमाणपत्र व छत्रपती शिवाजी महाराजांनाची मूर्ती देण्यात आली.या कार्यक्रमाला सरकार ग्रुप व अखंड राजा शिवछत्रपती परिवाराचे सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या