🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


🌟भाजपकडून पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली : दिल्लीतील बैठकीत निर्णय होणार असल्याची चर्चा🌟 

* ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी उपसमितीची निर्मिती करणार असल्याचे ओबीसी शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्र्वासन ; ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची मुंबईत बैठक,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवारही उपस्थित ;   लक्ष्मण हाकेंच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ, उदय सामंत, गिरीश महाजन आणि गोपीचंद पडळकरांनी घेतली भेट  मनोज जरांगे यांनी समोरासमोर चर्चा करावी ओबीसी आंदोलनकर्ते नेते लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे यांना आवाहन /मागणी 

* जातीयवाद आम्ही सुरू केला म्हणता, 'माधव' पॅटर्न मी सुरू केला का ? 9 मंत्री पाडणार, 13 तारखेनंतर सांगतो ; मनोज जरांगेंचा इशारा  ; 'तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन'; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा 

* छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण ? लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर पलटवार ; मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील OBC एकत्र झाला तर तुम्ही राजकारण विसरा ; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा ; आंदोलन कसं करावे हे लक्ष्मण हाकेंकडून शिका, पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगे यांना टोला 

* भाजपकडून पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली, दिल्लीतील बैठकीत निर्णय होणार असल्याची चर्चा 

* लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या, मात्र मविआमधील एकीसाठी दोन पाऊलं मागे घेतली, पुण्यातील बैठकीत शरद पवारांचा मोठं वक्तव्य, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांसोबत पवारांची बैठक ; विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 96-96-96 चा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा 

* पत्नीला भुलीचं इंजेक्शन, गाडीपर्यंत फरफटत नेऊन डांबलं; वटपौर्णिमेला पुण्यातील संतापजनक घटना समोर

* बार्शीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट पण वटपौर्णिमेमुळे महिला कामगार सुट्टीवर असल्याने मोठा अनर्थ टळला, कानठळ्यांनी हादरला परिसर 

* पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीसाठी कोर्टात हायप्रोफाईल वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयाचे सरकारवर ताशेरे 

* जीवघेणा स्टंट करणाऱ्या पुण्यातील रिल्सवीरांची नावं समजली; स्टंट पडणार महागात , कायद्यातील कठोर कलम लागणार 

* NET परीक्षेचा पेपर फुटलाच, डार्कनेटवर अपलोडही झाला, CBI तपासातून मोठा खुलासा 

* आगामी सर्व सामन्यात तीन फिरकीपटू खेळणार?; अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माने सांगितले रहस्य ; सामनावीर पुरस्काराच्या यादीत सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकले 

* NEET चा पेपर ३२ लाख रुपयांना विकला गेला, परीक्षेआधी एक दिवस प्रश्नपत्रिका दिली गेली, ४ आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिल्याची सूत्रांची माहिती.

* काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई काँग्रेस कार्यालयात नीट परीक्षा घोळाविरोधात आंदोलन, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात. 

* मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये काँग्रेसचं आंदोलन, नीट परीक्षा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी, आंदोलनात नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप सहभागी.

* महायुती सरकारविरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन. महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात आंदोलन. यावेळी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

* युजीसीकडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर डिफॉल्टर विद्यापीठांची यादी जाहीर, त्यामध्ये देशातील तब्बल १५७ विद्यापीठांचा समावेश. 

* सीईटीच्या पेपरमध्ये अनेक चुका होत्या, विद्यार्थ्यांप्रति सरकारची जबाबदारी आहे की नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल, तर फेरपरीक्षा नको ही आमचीही मागणी, ठाकरेंचं वक्तव्य. 

* मनोज जरांगे यांनी समोरासमोर चर्चा करावी ओबीसी आंदोलनकर्ते नेते लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे यांना आवाहन / मागणी                                                   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या