🌟 आपल्या चिमुकलीचा पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा करून शिक्षकाने ठेवला आदर्श...!


🌟पुर्णेतील अभिनव विद्या विहार प्रशालेतील शिक्षक रोशन धुळे यांचा कौतुकास्पद उपक्रम🌟


 
पुर्णा :- पुर्णा शहरातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या अभिनव विद्या विहार प्रशाला येथील शिक्षक श्री रोशन धुळे सर व त्यांची अर्धांगिनी सौ पूजा धुळे यांनी आपली मुलगी अधीरा हिचा तिसरा वाढदिवस शाळेमध्ये 50 वेगवेगळे प्रकारची झाडे लावून साजरा केला डब्याच्या कुंड्या तयार करून त्याला रंगरंगोटी करून त्यामध्ये सेंद्रिय खत टाकून झाडांची लागवड केली परभणी जिल्ह्यामध्ये तापमान 45 अंश डिग्री पेक्षा पुढे जात असताना पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा करून त्यांनी विद्यार्थ्यांपुढे व समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

या स्तुत्य उपक्रमासाठी शाळेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष मा श्री आनंदजी अजमेरा, संचालिका सौ अर्चना अजमेरा, माजी मुख्याध्यापक श्री हिराजी भोसले सर ,संचालक श्री दिलीपराव माने सर, श्री विजयरावजी कदम ,श्री जिगर लोढया ,श्री अमोल सोनटक्के व शाळेचे मुख्याध्यापक श्री सत्यनारायण रणवीर, पर्यवेक्षक श्री रमेश सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षक श्री गजानन इंगोले, सौ गीतांजली क्षीरसागर, श्री नवनाथ भताने, श्री अनुप देशमुख, श्री नंदकिशोर अडबलवार सर, श्री विश्वनाथ नागठाणे सर, सौ रसिका पळसकर, श्रीमती मीना दगडू , श्रीमती सरस्वती अनमुलवाड, सौ पुर्वी लोडया, श्री गोलू धुत ,श्री शंकर यमगर  इत्यादी सहकाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या