🌟पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात केवळ २५.९४ टक्केच पाणीसाठा....!


🌟अशी माहिती पुर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली आहे🌟 

परभणी (दि.१२ जुन २०२४) :  पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात केवळ २५.९४ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.

           या जलाशयात १२४.६७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा,८०९.७७० दशलक्ष घनमीटर जीवंत पाणीसाठा व ९३४.४४० दशलक्ष घनमीटर एवढ्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. त्या तूलनेत आज बुधवार दि.१२ जुन रोजी सकाळी ०८.०० वाजेपर्यंत या जलाशयात १२४.६७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा ११८.१७० जिवंत पाणीसाठा तर ३४२.८४० एवढा एकूण साठा उपलब्ध आहे जलाशयातील पाणी पातळी ४५४.०१० मीटर एवढी असून मागील २४ तासात या जलाशयात ०.८३३ दशलक्ष घनमीटर एवढी पाण्याची आवक झाली. जलाशयात २६.९४ टक्के एवढा जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे अशी माहिती पूर्णा पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या