🌟शेती गेली बंधाऱ्यात शेतकऱ्यांचा मावेजा अजूनही अंधारात ? बंधाराग्रस्त शेतकरी हक्काच्या मावेज्यासाठी शासनाच्या दारात...!


🌟राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जगाच्या पोशिंद्याच्या व्यथेकडे लक्ष देण्याची गरज🌟    

परभणी (दि.१४ जुन २०२४) - परभणी जिल्हातील पालम तालुक्यातील 'दिग्रस बंधारा' पाणलोट क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात शेती गेली बंधाऱ्यात मावेजा अजून अंधारात त्या मूळे जगाचा पोशिंदा म्हणविणारा  शेतकरी मावेजा मिळावा याची प्रतिक्षा करीत आहे. तालूक्यातील डिग्रस बंधा-यात शेतकर्‍यांची शेती मोठ्या प्रमाणात गेली आणि मावेजा अधिकारी मावेजा अजून ही वाढीव आदा करीत नसल्याने परभणी जिल्हातील पालम तालुक्यातील फरकंडा येथील दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या आहेत. परंतु उर्वरित राहिलेल्या पालम तालूक्यातील  फरकंडा येथील काही शेतक-यांना त्यांच्या संपूर्ण जमिनीचा अद्याप ही मावेजा मिळाला नाही.

गेल्या दोन ते तीन वर्षा पासून शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करत पाणलोट क्षेत्रातील शेतकरी करत असून मार्गदर्शन वर मार्गदर्शन मागवण्यात येत आहे. पण प्रश्न काही निकाली काढण्यात येत नाही. त्यामुळे हा प्रश्न कधी निकाली लागेल या कडे जगाचा पोशिंदा असलेल्या पालम तालूक्यातील *फरकंडा* येथील  शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहे. त्या मूळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून लोक कल्याणकारी प्रशासनाला खेटे मारून शेतकरी हैराण झाले आहेत. 

तर बुडीत क्षेत्रात जमीन लावून ही मोबदल्यासाठी वारंवार खेटे मारावे लागतात याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत   शासनाने जमीनभूसंपादन

करून तात्काळ मोबदला वाटप करावा अशी मागणीचे अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. पण प्रशासन गंभीर पणाने दर वेळ घेत नसल्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष पसरत आहे. त्या मूळे नैराश्यमय भावना झालेल्या शेतकऱ्यांना राज्याचे कर्तव्यदक्ष व सक्षम मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असे *प्रकल्पग्रस्त त्रस्त* शेतकरी प्रसाद पौळ यांच्यासह या प्रकल्पामध्ये जमीने गेलेल्या  शेतकऱ्यातून बोलले जात आहे.

***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या