🌟सायकल चालवण्याचा छंद ठेवतो तुम्हाला तंदुरूस्त - नारायण व्यास


🌟सन २०१४ पासून नारायण व्यास यांनी भारतातील असंख्य ठिकाणी सायकल प्रवास करुन नावलौकिक मिळवले🌟

फुलचंद भगत

वाशिम - ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो सायकल चालवणे हे शरीराला मजबूत व निरोगी बनवते. त्यामुळे सर्वांनी २४ तासातुन एक तास तरी आपल्या आरोग्यासाठी काढून रोज एक तास सायकल चालवावी असे आवाहन सायकलपटु नारायण व्यास यांनी केले आहे.


सन २०१४ पासून नारायण व्यास यांनी भारतातील असंख्य ठिकाणी सायकल प्रवास करुन आपले नाव वाशिमच नाही तर भारत भर झळकावले आहे. नारायण चा पहिला लांब प्रवास हा वाशीम ते लालबागचा राजा मुंबई असा ६०० किलोमीटर चा होता त्या नंतर नारायण ने वाशिम ते वाघा बॉर्डर १८०० किलोमीटर प्रवास कुठल्याही बैकअप वैन शिवाय १० दिवसांमध्ये पूर्ण केला, यामागचं उद्देश देश्यामध्ये शांति व एकात्मता राहावे हा होता, असे लांब प्रवास केल्यामुळे नारायणचे मनोबल वाढत गेले. कोरोना काळात रियल हीरो म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता सोनू सूद ला समर्पित फेब्रुवारी २०२२ मधे नारायण ने २००० किलोमीटरचा पल्ला पार करत दक्षिणेचे टोक रामसेतू पर्यत सायकल प्रवास करुन अभिनेता सोनू सूद याला ही सायकल राईड समर्पित केली होती. सोनू सूदने देखील यांची प्रशंसा म्हणून नारायणला भेटायला मुंबईला बोलवून घेतले व त्याचा मान वाढवला. पुढे २०२२ मधेच नारायणने इंडिया गेट ते गेट वे ऑफ इंडिया अशी दिल्ली ते मुंबई सायकल राईड भारतरत्न  सचिन तेंडुलकर याला समर्पित म्हणून सायकल वारी केली. हे अंतर जवळपास १४२० किलोमीटर एवढे होते. या सायकल राईडची दखल घेत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी त्याला इंदोर येथे बोलून नारायणला टीशर्ट व ऑटोग्राफ देऊन नारायणाचे मनोबल वाढवले व ट्वीटर वर पोस्ट शेअर करुन नारायणचे कौतुक करत लिहले. ‘सायकल ही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तू हा प्रवास सायकलने करतो आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक यू  असे लिहत आभार मानले. या सगळ्या मोठ्या राईड्समुळे सायकल पट्टू नारायणचे मनोबल वाढत गेले व त्याने मग देशासाठी समर्पित सायकल वारी करण्याचे ठरवले. १५ ऑगस्ट २०२४ मध्ये वाशीम ते कारगिल वॉर अशी २५०० किलोमीटर सायकल राईड त्याने भारतीय सेनेला समर्पित म्हणून सायकल प्रवास सुरू केला. हा प्रवास ११ दिवसात पूर्ण करून त्याने वाशिम जिल्ह्याचे नाव भारतभर झळकावले. या सगळ्या सायकल राईड्सचा परिणाम असा झाला की आज वाशिम शहरात बरेच लोक सायकलिंगकडे वळत आहेत. रोजच्या कामात सायकलचा वापर वाढत आहे. लहान मुलांना यामधून एक दिशा मिळते आहे की तुम्ही तुमचा छंद जोपासला तर त्यामध्ये सुद्धा आपले नाव लौकीक करू शकता. निरोगी आयुष्यासाठी सायकलचा व्यायाम खूप चागला आहे असे डॉक्टर सुद्धा सांगतात. सायकल चालविल्याने प्रतिकार शक्ती वाढते. चांगली झोप लागते. विचारसरणी सकारात्मक होते. प्रदूषण कमी होते. सामाजीक बांधीलकी वाढते. मुलांमध्ये मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी मदत होते. आज जागतिक सायकल दिनी आपण सुद्धा सायकल चालवणे सुरू करावे असे आवाहन सायकलपटू नारायण व्यास यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या