🌟वसमत तालुक्यातील आरळ येथील अन्नपूर्णादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार....!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापक सचिव तथा प्राचार्या सौ रजनीताई मोरे ह्या होत्या🌟

वसमत (प्रतीनिधी) :- वसमत तालुक्यातील आरळ येथील अन्नपूर्णादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थीचा सत्कार मंगळवार दि 04 जून रोजी शाळेच्या प्रांगणात करण्यात आला 

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापक सचिव तथा प्राचार्या सौ रजनीताई मोरे ह्या होत्या या वर्षी शाळेचा दहावी चा निकाल 99 टक्के लागला असून त्या मध्ये प्रथम कु वैष्णवी कल्याणकर द्वितीय कु श्रुती इंगोले व कु शिवानी रखोडे या आल्या असून 27 विद्यार्थी प्रविण्यासह उत्तीर्ण झाले तर 12 वी चा निकाल 96  टक्के लागला असून विज्ञान विभागातून प्रथम कु रोहिणी बागल तर द्वितीय आकांशा चोपडे तर कला विभागातून प्रथम कु निकिता काळे तर द्वितीय अक्षय मानवते तसेच एम सी व्ही सी विभागातून प्रथम कु कोमल वैरागे द्वितीय  कु वैष्णवी सवंडकर आदींनी यश मिळवले या गुणवंत विध्यार्थ्यांचे शाल श्रीफळ प्रशिसथीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा एस एस भगत , प्रा एस जे काळे ,  प्रा ए पी बिरादार , प्रा व्ही एम  भवरे , प्रा बी आर पतंगे , जी पी देशमुख , एम एन खराटे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस इंगोले यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक कर्मचारी व पालक मोठया संख्येनी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या