🌟पुर्णेतील बुध्द विहारात ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त उद्या शनिवारी २२ जुन रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन....!


🌟यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचे स्वीय सहाय्यक विठ्ठलराव साखरे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟


पुर्णा :- पुर्णा येथील बुद्ध विहारात उद्या शनिवार दि.२२ जून २०२४ रोजी ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात धम्मदेशना वृक्षारोपण दहावी व बारावी मधील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

 शनिवार दि.२२ जुन रोजी सकाळी ०५.३० वाजता परित्राण पाठ सूत्रपठन दुपारी १२.३० वाजता वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो अजंठा धम्मचल येथील भदंत बोधिधम्मा बुद्ध विहार पूर्णा येथील भदंत पयावंश यांची धम्मदेशना होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचे स्वीय सहाय्यक विठ्ठलराव साखरे जय भीम सेना महाराष्ट्राचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडे पूर्णा येथील भारतीय स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार जोंधळे लातूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक जयकुमार पवार पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे आदींची उपस्थिती असणार आहे कार्यक्रमानंतर दिवंगत स्मृतीशेष नितीन हरिहर  नरवडे यांच्या स्मरणार्थ उपस्थितांना खीर दान करण्यात येणार आहे.

 या प्रबोधन कार्यक्रमास उपस्थित राहावे अशा प्रकारचे आव्हान बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा भदंत उपाली थेरो वाचनालय भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या