🌟पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील तरुण शेतकऱ्याने कर्जास कंटाळून केली गळफास घेऊन आत्महत्या....!


🌟शेतकरी अमोल बोबडे यांनी कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या🌟

पुर्णा (दि.१४ जुन २०२४) :- पुर्णा तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सातत्याने सुरु असून मागील तीन महिन्यांच्या कालावधीत कर्जाला कंटाळून जवळपास चार ते पाच शेतकऱ्यांची आत्महत्ये सारख्या टोकाच्या मार्गाचा अवलंब करीत आपले जीवन संपवल्याचे हृयविदारक प्रसंग घडल्याचे समोर आले असून अशीच गंभीर व हृदयविदारक घटना काल गुरुवार दि.१३ जुन २०२४ रोजी ०४.०० वाजेच्या सुमारास पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथे घडली असून माटेगाव येथील २७ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी अमोल देविदास बोबडे या तरुण शेतकऱ्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमोल यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती आहे सततची नापिकी शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळे व तसेच मराठवाडा ग्रामीण बँकेचे अडीच लाख रुपयांचे कर्ज कसे फेडावे यामुळे आत्महत्या केली अशी माहिती वडील देविदास बोबडे यांनी दिली.  त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे  यांनी भेट दिली याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या