🌟हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) गटाला धक्का....!


🌟राज्याचे मा.सहकारमंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडांनी सोडली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ🌟

🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मा.मंत्री डॉ.मुंदडांनी केला शिवसेना शिंदे गटात केला जाहीर प्रवेश🌟


 
हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी सहकार मंत्री डॉ.जय प्रकाशजी मुंदडा यांनी देखील शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) गटाला मोठा धक्का बसला असून त्यांनी काल शुक्रवार दि.१४ जुन २०२४ रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षाचा ध्वज तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या