🌟परभणीत ग्रामसेवक पदाची ऑनलाईन परीक्षा ३ सत्रात : परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू.....!

🌟ग्रामसेवक पदाची ऑनलाईन परीक्षा दि.१८ ते २१ जून २०२४ रोजी ३ सत्रात होणार🌟

परभणी (दि.१५ जुन २०२४) : परभणी जिल्ह्यात‌ील रामकृष्ण परमहंस कॉलेज ऑफ फार्मसी एनएच- ६१ पाथरी रोड, हसनापूर आणि  ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी, परभणी आकाशवाणी परिसर धर्मापुरी या दोन परीक्षा केंद्रावर दि. १८ ते २१ जून २०२४ रोजी ग्रामसेवक पदाची ऑनलाईन परीक्षा ३ सत्रात होणार असून या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकाेनातून परीक्षा केंद्र परिसरात कोणतीही व्यक्ती तसेच वाहनास प्रवेश करण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.  

या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा केंद्राजवळच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील प्राप्त अधिकाराचा वापर करुन रामकृष्ण परमहंस कॉलेज ऑफ फार्मसी एनएच-६१ पाथरी रोड, हसनापूर, ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी, परभणी आकाशवाणी परिसर धर्मापूरी या दोन परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. हे आदेश परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत. वरील आदेश १८ ते २१ जून २०२४ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत लागू राहतील.....   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या