🌟मुंबई वडाळा येथे झालेल्या राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत आदित्य खळीकरचे यश....!


🌟एक सिल्वर व एक ब्रांझ मेडल प्राप्त सर्वत्र कौतूक🌟

परभणी (दि.०३ मे २०२४) : नुकत्याच मुंबई वडाळा येथे झालेल्या राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत येथील आदित्य खळीकर या खेळाडूने एक सिल्वर व एक ब्रांझ मेडल प्राप्त करीत घवघवीत यश संपादन केले आहे.

             मुंबई वडाळा येथे झालेल्या या राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत आदित्य खळीकर व राजवर्धन देशमुख हे दोघे परभणी जिल्ह्याकडून सहभागी झाले होते. या स्पर्धेत आदित्य खळीकरणे वैयक्तिक क्रीडा प्रकारात एक सिल्वर मेडल व एक ब्रांनझ  मेडल मिळवत परभणीच्या अभिमानात भर घातली. प्रशिक्षक संदीप लटपटे, प्रदीप लटपटे यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संघटनेचे सचिव उत्तमराव लटपटे यांनी आनंद व्यक्त असून सर्वत्र अदित्यचे कौतूक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या