🌟राज्य बाल धोरण कृती आराखड्यासाठी हरकती व सूचना आमंत्रित....!


🌟महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आवाहन🌟 

परभणी (दि.18 जुन 2024) : राज्यात प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 चा प्रारुप मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. दिनांक 30 जूनपर्यंत त्याकरिता मुदत असल्याचे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

या धोरण व कृती आराखड्यात आवश्यक बाबी, सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण यासंदर्भात हरकती दिनांक 30 जून 2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय, जुन्या सर्किट हाउसजवळ पुणे-1 या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या