🌟विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी श्री.संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा....!


🌟तसेच नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल असे नामांतर करा🌟

 🌟सकल भारतीय सोनार समाज संघटनेची राज्य सरकारकडे मागणी🌟 

नाशिक (प्रतिनिधी) - महाराष्ट्र  शासनाने नजीक येऊन ठेपलेल्या  निवडणुका आणि तोंडावर आलेली निवडणूक आचारसंहिता या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीत प्रलंबित निर्णयांचा धडाका लावला होता. मुंबईतील ब्रिटिशकालीन सात रेल्वे स्थानकांचे इंग्रजी नावांचे मराठी नामांतर करण्याची प्रलंबित मागणी मंजूर झाली. असे असले, तरी  ऑल इंडिया सोनार फेडरेशनने केलेल्या श्री संत शिरोमणी नरहरी आर्थिक विकास महामंडळ तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट रेल्वे टर्मिनस असे नाव देण्यात यावे, या मागणीबाबत केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन अजूनही उदासीनता दाखवत आहे. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस चे नामविस्तार या मागण्या मंजूर झाल्याचा निर्णय महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने ३० जून २०२४ पूर्वी जाहीर करावा, अशी मागणी ऑल इंडिया सोनार फेडरेशन,सकल भारतीय सोनार समाज संघटन,नाना जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठान, मुंबई,ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र राज्य आणि सेतुबंधन मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी केली आहे.

सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ बाबतची मागणी तसेच भारतीय रेल्वेचे शिल्पकार नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला देण्यात यावे, या दोन्ही मागण्या ३० जून २०२४ पर्यंत मंजूर करून त्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. वरील दोन्ही मागण्या मंजूर करून त्यासंदर्भात अध्यादेश ३० जून २०२४ पूर्वी जरी न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा देण्यात येईल, अशी चर्चा संपूर्ण भारतात विखुरलेल्या सोनार समाजात होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या