🌟मत मोजणी विशेष : आज कोण हसतो आणि रडतो कोण ?


🌟देशात इव्हीएमवरून विरोधक नेहमी आक्रमक होताना पाहायला मिळतात🌟

आपल्या भारत देशात आज ४ जूनला १८ व्या लोकसभा निवडणुकीचं निकाल जाहीर होत आहे. देशात एकूण सात टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक झाली आहे. मतदान करण्यासाठी आपण इव्हीएमचा वापर केला. या निवडणुकीत "इव्हीएम हटाओ देश बचाओ"चा नारा विरोधकांकडून देण्यात आला होता. कारण ज्या उमेदवाराचा पराभव होतो त्याला असं वाटतं की इव्हीएममुळे आपला पराभव झाला. त्यामुळे प्रत्येक निवणुकीत इव्हीएमचा मुद्दा हा समोर येतच असतो. सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार निवडून आला, असे जाहीर केले जाते. त्याला इव्हीएमने कौल दिल्याचे समजले जाते. हाच लोकशाहीच्या उत्सवाचा परमोच्च क्षण होय. याबद्दलचा माहितीपूर्ण संकलित लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी मांडला आहे... संपादक.

           मतदानाची मोजणी कशी होत आहे ? तर देशात इव्हीएमवरून विरोधक नेहमी आक्रमक होताना पाहायला मिळतात. जर अमेरिका सारख्या देशामध्ये तो हॅक होऊ शकतो तर भारतात का नाही ? असा सवाल त्यांचा आहे. त्यामुळे इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. अशी त्यांची मागणी आहे. पण हे सुरक्षित मशीन आहे असं निवडणूक आयोग सांगत आलाय. इव्हीएम म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक वोटर मशीन म्हणजे त्यालाच आपण इव्हीएम म्हणतो. त्याचा प्रस्ताव सर्वात आधी सन १९७७मध्ये मांडण्यात आला. त्यानंतर सन १९७९मध्ये पहिल्यांदा इव्हीएम तयार करण्यात आले. पुढे हळू हळू संपूर्ण देशात इव्हीएमवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. देशात दोन ठिकाणी या मशीन तयार केले जातात. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन्ही कंपन्या भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. 

         मतमोजणी- मतदान झाल्यानंतर इव्हीएमला सील मारून त्याला एका स्टोअर रूममध्ये ठेवण्यात येते. त्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दलाचे जवान चोवीस तास तैनात असतात. जेव्हा निकालाचा दिवस असतो, तेव्हा ती मशीन स्टोअर रूममधून बाहेर काढण्यात येते. मतमोजणी करत असताना एका वेळी फक्त १४ मशीनचीच मोजणी केली जाते. त्यासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात येते. प्रत्येक टेबलवर एक निवडणूक अधिकारी, उमेदवार आणि त्या त्या पक्षाचा एक सदस्य असतो. मतमोजणी सुरू असताना तो या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवतो. उमेदवाराने इव्हीएमला हात लावू नये यासाठी मध्ये एक बरिकेट्स ठेवण्यात येतो. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होते. त्यानंतर अर्ध्या तासाने इव्हीएम मतांची मोजणी होते. ही मोजणी सुरू करण्याआधी त्याच्या सीलची तपासणी केले जाते. मशीनसोबत कोणतीही छेडछाड तर झाली नाही ना? याची तपासणी मतमोजणी अधिकारी करून घेतो. त्यानंतरच मतमोजणीसाठी ते मशीन सुरू करण्यात येते. लगेच रिझल्ट बटन दाबलं जाते. कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याची आकडेवारी समोर येते. त्यांनतर ही आकडेवारी फॉर्म क्रमांक १७ सीमध्ये नोंदवली जाते. त्यावर जो कोणी उमेदवाराच्या बाजूने मतमोजणीसाठी उपस्थित आहे, त्याची सही घेण्यात येते. त्यानंतर त्या फॉर्मला रिटर्निंग ऑफिसर्सकडे पाठवण्यात येते. आलेल्या निकालाला एका ब्लॅक अँड व्हाईट बोर्डवरती लिहण्यात येते. प्रत्येक फेरीत होणाऱ्या मतमोजणीची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला सांगण्यात येते. ही प्रक्रिया जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत चालत राहते. शेवटी ज्या उमेदवाराला जास्त मते मिळाली अशा उमेदवाराला विजयाचं प्रमाणपत्र देऊन निवडणूक अधिकारी त्याला विजय घोषित करतात.

         या निवडणुकीत "इव्हीएम हटाओ देश बचाओ"चा नारा विरोधकांकडून देण्यात आला होता. कारण ज्या उमेदवाराचा पराभव होतो त्याला असं वाटतं की इव्हीएममुळे आपला पराभव झाला. त्यामुळे प्रत्येक निवणुकीत इव्हीएमचा मुद्दा हा समोर येतच असतो. सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार निवडून आला, असे जाहीर केले जाते. त्याला इव्हीएमने कौल दिल्याचे समजले जाते. हाच लोकशाहीच्या उत्सवाचा परमोच्च क्षण होय. आज निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचते. लोक निकाल ऐकण्यासाठी रेडिओला कान लावून, पाहण्यासाठी टिव्हीकडे डोळे फाडफाडून आणि प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून बसतील. निवडून येणारा उमेदवार, त्याच्या पार्टीतील नेते आणि समर्थक गुलाल उधळून होळी खेळत प्रतिस्पर्धकांना, पराजित उमेदवारांना वाकुल्या दावतील. दोन बोटे वर करून विजयाची खून दाखत विजयी मिरवणूकीद्वारे थाटामाटात मिरवतील. चला तर सज्ज होऊया.......

!! विजयी उमेदवाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जी !!

                  - संकलन व सुलेखन -

                  श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                  रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                  फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या