🌟परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित सन्मान कर्तुत्वाचा गौरव गुणवत्तेचा कार्यक्रम संपन्न.....!

               


🌟आयोजक बालासाहेब जगतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले🌟  


  
परळी (दि.१७ जुन २०२४)--परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा आयोजित सन्मान कर्तुत्वाचा गौरव गुणवत्तेचा हा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमात या उपक्रमाबद्दल बाळासाहेब जगतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती ही देण्यात आली आहे.   


           
याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने भीम नगर साठे नगर रमा नगर व प्रबुद्ध नगर येथील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार व दहावी बारावी नंतर काय या विषयावर विशेष मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात  आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एडवोकेट अनंतराव जगतकर तर प्रमुख उपस्थिती बीड येथील देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी शहरातील नामवंत युवा उद्योजक व्ही के कलर होम चे संचालक माननीय विनोद कांबळे तर विशेष निमंत्रित म्हणून मुंबई रेल्वे मेट्रोचे व्यवस्थापक माननीय राजू श्रावण जगतकर गंगाखेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा राजश्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गुणवंत जगतकर परळी न्यायालयाचे एडवोकेट दिलीप उजगरे प्राध्यापक विलास रोडे राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक आदर्श पुरस्कार करते परभणी लोहगावचे नरसिंह कॉलेजचे शिक्षक शेख सर नरसिंह कॉलेज लोहगावच्या डॉक्टर प्राध्यापक यशश्री जगतकर औरंगाबाद हायकोर्टाच्या वकील एडवोकेट ऐश्वर्या पवार बनसोडे न्यूज महाराष्ट्र वन चे संपादक श्री खांडेकरआदी उपस्थित होत्या तर विशेष मार्गदर्शक म्हणून आई सेंटरचे संचालक प्राध्यापक नागेश जोंधळे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं असून विद्यार्थ्यांनी काय करावं याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे या कार्यक्रमात दहावी बारावी व विशेष प्राधान्य मिळवलेल्या व शेतकरी कुटुंबातील अनिशा विलास आठवले हिने नीट परीक्षेत सातशे पैकी 582 गुण घेऊन तर एडवोकेट संजय जगतकर यांच्या मुलीचा कॅनडा येथे मानसशास्त्र या विषया वर निवड झाल्याबद्दल हृदय सत्कार करण्यात आला असून यात एकूण 51 विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ समृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास भीम नगर साठे नगर रमा नगर प्रबुद्ध नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजक बाळासाहेब जगतकर यांचे कौतुक करण्यात आले असून यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्राध्यापक संघपाल समुद्रे सोपानराव ताटे एडवोकेट संजय जगतकर प्राध्यापक बालाजी जगतकर मिथुन रोडे सर प्राध्यापक महादू हावळे महादू रोडे सर अशोक तर कसे अशोक जगतकर राज जगतकर सिद्धार्थ जगतकर उत्तम समुद्रे संजय शिंदे दशरथ जगतकर राहुल जगतकर रावसाहेब जगतकर कपिल ताटे चेतन ताटे किरण कांबळे रमेश तायडे विशाल बनसोडे मनोज कांबळे रमेश जगतकर धम्मा अवचारे राम हावळे समाधान भिसे दौलत हनवते सारनाथ जगतकर बंडू इंगळे विवेक बनसोडे इत्यादी सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य आनंद तूपसमुद्रे यांनी प्रस्ताविक वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष प्रेम जगतकर यांनी तर आभार तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका डॉक्टर प्राध्यापक यशस्वी जगतकर यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या