🌟पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाच्या विनाशपर्वाला तीन दशकांपासून सुरुवात : विनाशपर्वाचा शेवट अखेर अंतिम टप्प्यात ?


🌟नांदेड-चुडावा-मरसूळ-वसमत मार्गे हिंगोली बायपास करीता जमीन अधिग्रहणाचा अध्यादेश जारी🌟


  
मुक्काम पोस्ट पुर्णा 

पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) - दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणारे निझाम/ब्रिटिश राजवटीतील सर्वात महत्त्वाचे आणि भौगोलिक आर्थिक दृष्ट्या सर्व सुख सुविधा संपन्न असलेले मराठवाड्यातील सर्वात मोठे जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणारे पुर्णा जंक्शनच्या विनाशपर्वाला खऱ्या अर्थाने मागील तीन दशकांपूर्वीच सुरुवात झाली मिटरगेज लोहमार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्गात रुपांतर होण्यापूर्वी पुर्णा रेल्वे स्थानकावरील लोकोशेडसह विविध कार्यालयात तसेच रनिंग स्टॉफ अंतर्गत जवळपास पाच साडेपाच हजार कर्मचारी कार्यरत होते त्यामुळे रेल्वे परिसर तसेच रेल्वेची शेकडो निवासस्थान अक्षरशः गजबजलेली दिसत असे व्यापार पेठेत देखील महिन्याकाठी प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असे परंतु मिटरगेज लोहमार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्गात रुपांतर झाल्यानंतर मात्र भौगोलिक दृष्ट्या सर्व संपन्न असलेल्या पुर्णा जंक्शन येथे डिझेल शेडसह दक्षिण मध्य रेल्वेचे विभागातील व्यवस्थापक कार्यालय देखील कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनात कार्यरत मराठी द्वेष्ट्या दाक्षिणात्य अधिकारी तसेच कर्मचारी संघटनांनी व कमकुवत बुद्धीमत्तेच्या राजकीय पुढाऱ्यांनी पुर्णा रेल्वे जंक्शनच्या विनाशपर्वाला खतपाणी घालण्यास सुरुवात केल्यामुळे पुर्णेत रेल्वेची मोठ्या प्रमाणात जमीन संपत्ती तसेच कार्यालयांसाठी सुसज्ज इमारतींसह अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी शेकडो निवासस्थान पाण्याची व्यवस्था असतांना देखील पुर्णा रेल्वे जंक्शनच्या हक्काचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयांसह विविध कार्यालय नांदेड येथे नव्याने कोट्यावधी रुपयांची जमीन संपत्ती खरेदी करून कार्यान्वित करण्याचा अघोरी अट्टाहास केला. 


 नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत कार्यरत भाषा प्रांतवाद्यांसह कमकुवत बुद्धीमत्तेच्या राजकीय पुढाऱ्यांनी पुर्णा रेल्वे जंक्शनवर सातत्याने सुड उडवण्याचा गंभीर प्रकार चालवला असतांना मात्र परभणी जिल्ह्यातील अकार्यक्षम संधीसाधू लोकप्रतिनिधींनी एकप्रकारे त्यांना मुग गिळून गप्प बसत मुकसंमतीच दर्शवल्याचे पाहावयास मिळत आहे पुर्णेत रेल्वे प्रशासनाची शेंकडों एक्कर जमीन संपत्ती असतांना देखील पुर्णेकरांच्या हक्काचा मराठवाडा रेल्वे कोच निर्मिती कारखाना सन २०१८ साली लातूरला पळवला जात असतांना परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी 'तुका म्हणे उभे राहावे जे जे होईल ते ते पाहावे' या भुमिकेत वावरल्याने शंकेची पाल चुकचुकली असेच म्हणावे लागेल मराठवाडा-विदर्भ-खांन्देशाला जोडणारा पुर्णा-अकोला-भुसावळ रेल्वे लोहमार्ग कार्यान्वित असतांना जालना-जळगाव हा मराठवाडा व खांन्देश विभागाला जोडणाऱ्या ७ हजार १०५ कोटी ४३ लाखांच्या १७४ किलोमीटरच्या रेल्वे लोहमार्गाला मंजूरी देत पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकाचे महत्त्व कमी करण्याचा घाट घातला गेला परंतु याहीवेळी परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केवळ बघ्याचीच भुमिका पार पाडली.


दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकाच्या विनाश पर्वाची अखेर येवढ्यावर तरी पुर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु ही अपेक्षा देखील फोल ठरली असून आता दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील भाषा प्रांतवाद्यांसह कमकुवत बुद्धीमत्तेच्या राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर रेल्वे मंत्रालयाने नांदेड-चुडावा-मरसूळ-वसमत मार्गे हिंगोली या बायपास रेल्वे लोहमार्गाला मंजूरी देत जमीन संपादनासाठी दि.२४ जुन २०२४ रोजी अधिकृत अधिसुचना देखील जारी केली असून या बायपास रेल्वे लोहमार्गात पुर्णा तालुक्यातील आडगाव (लासीना) येथील ३४,बरबडी येथील ३७ तर गौर येथील ३१ शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या असून सदरील नांदेड-चुडावा-मरसूळ-वसमत मार्गे हिंगोली या बायपास रेल्वे लोहमार्गाचा पुर्णेकरांना कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही उलट भविष्यात पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकाच्या अधोगतीस हा बायपास रेल्वे लोहमार्ग कारणीभूत ठरणार आहे.

🔴 पुर्णा रेल्वे जंक्शन मुकले असंख्य महत्वाच्या कार्यालयांना :-


पुर्णा रेल्वे जंक्शनच्या हक्काचे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयाची नांदेडला स्थापना केल्यानंतर देखील असंतुष्ट आत्मे शांत झाले नाही आणि उपविभागीय व्यवस्थापक कार्यालय,रनिंग स्टॉफच्या क्र्यू-बुकींग लॉबीच्या स्थलांतरास पुर्णेकरांचा प्रखर विरोध असतांनाच देखील नांदेडला स्थलांतरित करण्यात आली पुर्णेकरांच्या हक्काच्या रेल्वे मराठी/तेलगू/इंग्लिश शाळा बंद करण्यात आल्या तसेच पुर्णेकरांच्या हक्काचे इलेक्ट्रीक शेड नांदेडला उभारण्यात आले,टिडब्ल्यूडी ऑफिस जालन्याला हलवण्यात आले,पुर्णेकरांच्या हक्काचा मराठवाडा रेल्वे कोच निर्मिती कारखाना लातूरला पळवण्यात आला.

🔴 पुर्णा रेल्वे जंक्शन बनले घोटाळ्याचे अजायब घर ?

निझाम ब्रिटिश राजवटीत दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणारे पुर्णा रेल्वे जंक्शन कधीकाळी मराठवाड्यातील सर्वात मोठे व भौगोलिक आर्थिक दृष्ट्या सर्वात सधन असे रेल्वे जंक्शन होते परंतु आजच्या परिस्थितीत मात्र घोटाळ्यांचे केंद्रबिंदू झाल्याचे निदर्शनास येत असून विकासाच्या महत्वाच्या प्रश्नावर लोकसभेत कधीच न गाजलेले पुर्णा रेल्वे जंक्शन मात्र कोट्यावधी रुपयांच्या डिझेल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेत दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण देशाला लोकसभेत गाजतांना देखील पाहावयास मिळाले आहे.

पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकावरील डिझेल डेपोतील डिझेल चोरी अर्थात डिझेल घोटाळ्याचे पित्तळ मागील पाच महिन्यांपूर्वी दि.२९ जानेवारी २०२४ रोजी परभणी जिल्हा स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने उघडे पाडले यावेळी स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगनापूर फाटा परिसरातून पुर्णा रेल्वे डिझेल डेपोला अर्धवट डिझेल पुरवठा करुन उर्वरित चोरीचे डिझेल घेऊन जाणारे डिझेल टँकर ड्रायव्हरसह ५ हजार पाचशे लिटर डिझेल सहीत ताब्यात घेतले पुर्णा डिझेल डेपोतील सरकारी डिझेल घोटाळेबाज मुख्य आरोपी आरसीडी मुख्य अधिक्षक माधव बलफेवाड,आरसीडी सहाय्यक अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन,डि.कृष्णा आरसीडी चिफ लोको इन्स्पेक्टर,ओएस कांचन कुमार हे अधिकारी/कर्मचारी जाणीवपूर्वक डिझेल टँकर खाली करीत असतांना डिझेल आवक/जावक दर्शवण्यासाठी लावले गेलेल्या मिटरसह (Flow Meter) सिसीटीव्ही कॅमेरे देखील पुर्णपणे बंद करुन सोईस्कररित्या डिझेल घोटाळ्याची मालिका चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले परंतु संबंधित सरकारी डिझेल घोटाळेबाजांना दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीच पाठीशी घालत असल्याचे देखील पाहावयास मिळाले त्यामुळे कधीकाळी सर्वात सधन व विकसीत रेल्वे जंक्शन असलेले पुर्णा रेल्वे जंक्शन आजच्या परिस्थितीत 'घोटाळ्याचे अजायब घर' झाल्याचे पाहावयास मिळत आहे....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या