🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या......!


🌟पंतप्रधात नरेंद्र मोदी मंत्रीमंडळात पंकजाताई मुंडे,नवनित राणा,महादेव जानकर यां पराभूत नेत्यांची वर्णी लागणार ?🌟


✍️ मोहन चौकेकर

* देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार ; संभाव्य मंत्रीमंडळात महाराष्ट्रातुन भाजपाचे नितीन गडकरी,पियुष गोयल,नारायण राणे, रक्षा खडसे, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले,शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, रवींद्र वायकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांची मंत्रीपदी वर्णी लागणार,पंकजा मुंडे व नवनीत राणा,राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर या पराभुत उमेदवारांची नावे देखील चर्चेत ?


* मी पळणारा नाही, लढणारा माणूस,अमित शाहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य,सध्या काम सुरु ठेवण्याचा शाहांचा सल्ला, तर मविआवरही जोरदार हल्लाबोल ; मराठा समाजाला सर्वकाही आपण  दिलं, पण मराठा समाजची मते मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या  पारड्यात गेली, असे म्हणत मराठवाड्यातील निकालावर देवेंद्र फडणवीसांची खंत 

* पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षांना आवाहन, विधानसभेसाठी कामाला लागण्याचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला ;  मुंबईत ठाकरे गटाला मराठी माणसाने मतं दिली नाहीत, महाविकास आघाडी खास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार एका विशिष्ट समाजाच्या ताकदीवर निवडून आल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा 

* ठाकरे गटाचे निवडून आलेले दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही आखला, खासदार नरेश मस्केंचा दावा ;  नरेश म्हस्के हे अपघाताने खासदार, अंगातला थिल्लरपणा कायम, खासदार संपर्कात आहेत तर नाव सांगा, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा पलटवार

* विधानसभेला पराभव झाला तरी अजितदादांना सोडणार नाही, बैठकीत आमदारांनी घेतली शपथ, हसन मुश्रीफांनी सांगितलं इतिवृत्त ; अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू; सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटें यांचे मत

* लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींच्या नावाच्या प्रस्तावास काँग्रेसची मंजुरी  

* पुण्यात मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी; रायगड, सांगली, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात धुव्वादार बरसला 

* पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट ; विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचीही शक्यता ; तळ कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज 

* यशस्वी जयस्वालला सलामीला पाठवा, विराटला नको, अन्यथा ते तुम्हाला महागात पडू शकतं, पाकचा माजी खेळाडू कामरान अकमलचा इशारा ;  रोहित शर्माच्या अंगठ्यावर आदळला चेंडू; भारत-पाकिस्तानाच्या सामन्याआधी वाढलं टेन्शन 

* वंदे भारत चालवणारी महिला लोको पायलट ही मोदींच्या शपथविधीला राहणार उपस्थित

* रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी 

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या