🌟परभणी जिल्ह्यात अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु.....!


🌟संबंधित अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा सदस्य सचिव यांनी केले🌟

परभणी (दि.11 जुन 2024) :- परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील मुलींना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये उच्च शिक्षण घेताना राहण्यासाठी गंगाखेड आणि सेलू येथे अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह आहेत. या वसतिगृहाच्या प्रवेशासाठी गंगाखेड येथील वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी 24 जून तर सेलू येथील वसतिगृहासाठी 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सेलू येथील वसतिगृहात 100 तर गंगाखेड येथील वसतिगृहात 60 मुलींच्या निवासाची सोय असून, त्यापैकी 70 टक्के जागा अल्पसंख्यांक समाजातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी मुलींसाठी आरक्षित असणार आहेत. उर्वरित 30 टक्के जागा बिगर अल्पसंख्यांक मुलींकडून शासनाच्या प्रचलित आरक्षणानुसार भरण्यात येणार आहेत. खुल्या व इतर प्रवर्गातील मुलींसाठी  प्रवेशासाठी प्रति सत्र 2 हजार 850 रुपये इतके निवासी शुल्क आकारण्यात येणार आहे.

वसतिगृहात प्रवेशित मुलींना जेवण आणि नाष्टा खर्च स्वतः करावा लागणार आहे. तसेच शासन निर्णयानुसार आहार भत्ता योजनेअंतर्गत अल्पसंख्यांक समाजातील पात्र मुलींसाठी तालुकास्तरीय मासिक भत्ता 3 हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा होणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी अल्पसंख्यांक मुलींचे शासकीय वसतिगृहाचे संबंधित अधीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या