🌟परभणी येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये मानसिक आजारावर अत्याधुनिक उपचार.....!


🌟अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांची माहिती : गरजू रुग्णांनी भेट देण्याचे केले आवाहन🌟

परभणी (दि.२९ जुन २०२४) : परभणी मेडिकल कॉलेज व आर. पी. हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे मानसिक आजारावरील अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे आता माफक दरात अत्याधुनिक उपचार होणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिली.

              आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणी मेडिकल कॉलेज व आर. पी. हॉस्पिटल येथे मानसिक आजाराने त्रस्त रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारे अत्याधुनिक उपचार प्रणाली  कार्यान्वित झाली असून यामध्ये मशीनद्वारे मेंदूत विद्युत लहरी प्रवाहित उपचार, मेंदूचा आलेख उपचार प्रणाली हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागात माफक दरात सुरू करण्यात आली आहे. या उपचारासाठी  आधी रुग्णांना मुंबई, हैदराबाद इत्यादी ठिकाणी जावे लागत असे आता रुग्णांना तिथे जाण्याची गरज नसून परभणी मेडिकल कॉलेज येथेच अवघ्या ५०० ते १००० रुपये मध्ये हि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्किझोफ्रेनिया, स्मृतीभ्रंश, नैराश्य, पार्किन्स, कॅटाटोनिया, बायपोलर डिसऑर्डर यासारख्या आजारावर अल्ट्रा बेरिफल्स या अत्याधुनिक मशीन द्वारे उपचार दर गुरुवार व शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परभणी वैद्यकीय महाविद्यालय व आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या