🌟राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.....!


🌟वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो.युसूफ पुंजानी व मा.नगराध्यक्ष श्री  डहाके यांचे मार्गदर्शनाखाली वर्धापण दिन साजरा🌟 


फुलचंद भगत

वाशिम :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १० जून ते १७ जून पर्यन्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार जिल्हा व तालुका पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले,त्याअनुषंगाने वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात रा.काँ.पा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुंजानी व माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके यांचे मार्गदर्शनाखाली व माजी जिप सभापती श्री जयकीसन राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक-१० जून रोजी सकाळी-१०.१० मिनिटांनी श्री देवव्रत डहाके यांचे हस्ते पक्ष कार्यालय पुंजानी कॉम्प्लेक्स कारंजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ध्वजारोहण करून करण्यात आली,ध्वजारोहण नंतर राष्ट्र गीत व भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकाचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,त्यानंतर स्व.श्री प्रकाशदादा वनपर्यटन केंद्र कारंजा येथे वृक्षारोपण करण्यात आले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी जिल्हा,तालुका,शहर व विविध सेलचे पदाधिकारी, नगरसेवक व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या