🌟पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०२३/२४ यावर्षीच्या पिक विमा भरपाईसह अतिवृष्टीचे ७० टक्के अनुदान तात्काळ द्या....!


🌟संभाजी ब्रिगेडची तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी🌟 

पुर्णा (दि.१४ जुन २०२४) - पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम सन २०२३/२४ यावर्षीच्या पिक विमा भरपाईसह अतिवृष्टीचे ७० टक्के अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी आज शुक्रवार दि.१४ जुन २०२४ रोजी पुर्णा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली

तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनावर संभाजी निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गंगाधर कदम, करण शिंदे ,शिवाजी बोबडे, राजू जोगदंड, बालाजी हिलाल, स्वप्नील कदम,आदींच्या स्वाक्षऱ्या असून यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या