🌟परभणी जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी २८.८ मिलीमीटर पावसाची नोंद....!


🌟जिल्ह्यात ०१ जूनपासून आतापर्यंत १२०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे🌟

परभणी (दि.१८ जुन २०२४) : परभणी जिल्ह्यात का रविवार दि.१६ जुन २०२४ रोजी सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

परभणी जिल्ह्यात आज सोमवार दि.१७ जुन रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी २८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे यात जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक तर जिंतूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.

        परभणी तालुक्यात ३४.५, गंगाखेड ३२.८, पाथरी ३४.७, जिंतूर ११.३, पुर्णा २६,पालम २४, सेलू ३१.७, सोनपेठ ४३.४ आणि मानवत तालुक्यात सर्वाधिक ३०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७६१ मिलिमीटर पाऊस पडतो जिल्ह्यात ०१ जूनपासून आतापर्यंत १२०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या