🌟विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कौशल्याची आवश्यकता.....!


🌟खासदार डॉ.फौजिया खान यांनी युवाशक्ती करीअर शिबीरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले प्रतिपादन🌟


 
परभणी (दि.20 जुन 2024) : विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे असे मत राज्यसभेच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी व्यक्त केले.

            येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तर उद्घाटक म्हणून खासदार खान यांची उपस्थिती होती.

          विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व त्या माध्यमातून स्वतः ची उन्नती करून घ्यावी. देशातील लोकसंख्येच्या मानाने रोजगाराच्या संधी अत्यंत कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडे कौशल्य असणे गरजेचे आहे. हे कौशल्य मिळवण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देते त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार खान यांनी केले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विकास आडे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात दहावी बारावी पास झालेले विद्यार्थी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या