🌟जागतिक सेवाभावी संस्था लायन्स इंटरनॅशनल शाखा परभणीच्या अध्यक्षपदी अरुण टाक....!


🌟परभणीत रविवार दि.२३ जुन रोजी पदग्रहन समारंभ  : निशिगंधा वाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार🌟 

परभणी (दि.२१ जुन २०२४) :  जागतिक सेवाभावी संस्था लायन्स इंटरनॅशनल परभणी शाखा लायन्स क्लब परभणी मेनच्या अध्यक्षपदी अरुण (अवि) टाक यांची निवड करण्यात आली आहे.

          नवनिर्वाचित अध्यक्ष टाक यांच्यासह लायन्स क्लब परभणी मेनच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा रविवार दि.२३ जुन रोजी अक्षदा मंगल कार्यालयात सकाळी १०.३० वाजता पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला असून त्यास माजी मल्टिपल चेअर पर्सन एमजेएफ दिलीप मोदी यांची पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थिती राहणार आहे. तर माजी प्रांतपाल राजेश राऊत, विजयकांत टाक हे प्रमुख पाहुणे म्हणून व मराठी चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य नायिका निशिगंधा वाड या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात प्रसिध्द गायक लक्ष्मीकांत उर्फ राजू काजे यांना लायन्स परभणी भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यास नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष टाक यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या