🌟नांदेड येथील जीएसटी कार्यालयातील ऑडिट विभाग नांदेड येथून इतरत्र स्थलांतरित करु नयें.....!


🌟भारतीय जनता पार्टीचे परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन🌟


परभणी :- नांदेड येथील जीएसटी कार्यालयातील ऑडिट विभाग नांदेड ऐवजी इतरत्र स्थलांतरित न करता तो नांदेड मध्येच ठेवावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दि.२६ जुन २०२४ रोजी सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

           महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाची फेररचना करण्याबाबत राज्य शासनाने प्रस्ताव तयार केला असून त्याअंतर्गत नांदेड येथे सुरू असलेला लेखापरीक्षण (ऑडिट) विभाग नांदेडऐवजी छत्रपती संभाजीनगर जीएसटी कार्यालयात सुरू करावा व नांदेड जीएसटी कार्यालयातील जीएसटी लेखा परिक्षणाची सर्व कामे छत्रपती संभाजीनगर कार्यालयात चालवावीत, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे नांदेड जीएसटी कार्यालयातील करदात्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून लेखापरीक्षण विभाग छत्रपती संभाजीनगरला न जोडता तो नांदेडमध्येच असला पाहिजे, अशी अपेक्षा कर सल्लागार, सर्व औद्योगिक व व्यापारी संघटना परभणी यांच्या वतीने भरोसे यांच्याकडे व्यक्त करण्यात आली होती. त्या अनुषंगाने भरोसे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांची भेट घेतली व जीएसटी कार्यालयातील ऑडिट विभाग नांदेडमध्ये ठेवावा, अशी मागणी केली. दरम्यान पवार यांनी नांदेड जिल्ह्याचा जीएसटी ऑडीट विभाग पूर्ववत नांदेडलाच ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन भरोसे यांना दिले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या