🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟विधानपरिषदेसाठी भाजपचे ५ पैकी २ उमेदवार जवळपास निश्चित,महादेव जानकर आणि पंकजा मुंडे विधानपरिषदेवर जाणार🌟

✍️ मोहन चौकेकर

* अजित पवारांच्या बजेटमध्ये लोकप्रिय घोषणांची खैरात, मुंबई,ठाणे,नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेल २ रुपयांनी तर पेट्रोल ६५ पैशांनी स्वस्त होणार.

* निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वीज बिल माफीची भेट,साडे सात हॉर्सपॉवरपर्यंतच्या ४६ लाख कृषी पंपांची वीज बिलं माफ.

* मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत, ८ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ, मेडिकल,इंजिनियरिंग,कृषी अभ्यासक्रम मोफत शिकता येणार.

* 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा,२१ ते ६० वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार, येत्या १ तारखेपासून अंमलबजावणी.

* मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा,प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत, ५२ लाख कुटुंबांना मिळणार लाभ.

* पंढरपूर वारीचा वर्ल्ड हेरिटेजसाठी युनेस्कोला प्रस्ताव, मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रति दिंडी राज्य सरकारने २० हजार रूपये जाहीर, वारकऱ्यांना पालखी मार्गावर मोफत तपासणी,उपचार.

* आजचा अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर आणि आश्वासनांची अतिवृष्टी, उद्धव ठाकरेंची टीका. तर भूलथापांचा नाही मायबापांचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर.

* आजचा अर्थसंकल्प म्हणजे लोकसभा पराभवाचं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, जयंत पाटलांची टीका.. तर राज्यात नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर.

* पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अपघात झाला तेव्हा कारचा वेग ताशी ११० किमी होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती, पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका योग्यच, फडणवीसांकडून पाठराखण

* ड्रग्ज घेणारे,विकणारे कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा...बुलडोझर,पोकलेन आणि जेसीबी लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार अशी ग्वाही.

* विधानपरिषदेसाठी भाजपचे ५ पैकी २ उमेदवार जवळपास निश्चित, महादेव जानकर आणि पंकजा मुंडे विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता.

* महाविकास आघाडी विधानपरिषदेची तिसरी जागा लढण्याच्या तयारीत, ठाकरे गटाकडून विनायक राऊतांचं नाव चर्चेत 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या