🌟मंगरुळपीर येथे महाराणा प्रताप जयंती ऊत्साहात साजरी.....!


🌟छत्रपती शिवाजी महाराज आणि शुरवीर महाराणा प्रताप यांचा इतिहास पुढील पिढी पर्यंत पोहचवने काळाची गरज🌟

फुलचंद भगत

वाशीम :- वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे  महाराणा प्रताप जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन  समस्त राजपुत समाज तथा महाराणा प्रताप ऊत्व समीती च्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महंत जितेंद्र महाराज पोहरागड हे होते तसेच प्रमुख उपस्थितीत लखनसिह ठाकुर , संदेश ठाकुर, योगेश ठाकुर, नितेश मलीक, मुकेश ठाकुर,योगेश ठाकुर,अक्षय राऊत हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रतापांच्या तैलीय चित्रा चे पुजन करून करण्यात आली. आणि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. या वेळी बिरबलनाथ महाराज संस्थान चे विश्वस्त रामकुमार रघुवंशी तसेचे कृष्ण कुमार रघुवंशी यानी जितेंद्र महाराज पोहरागड यांचा संस्थान च्या वतीने सत्कार केला.लगेच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.लहान चिमुकल्या मुलींनी महाराणा प्रताप जयंती निमित्त आपल्या शब्द सुमनांनी प्रेक्षक व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.जितेंद्र महाराज पोहरागड यांनी सुध्दा  महाराणा प्रतापसिंह यांचा स्वर्णिम इतिहास आपल्या वाणीतुन सांगीतला.आणि प्रमुख वक्ते तथा अभ्यासक, आणि मावळा अक्षय राऊत यांनी आपल्या खास शैलीत महाराणा प्रताप यांचा इतिहास सांगीतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष रघुवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षिता ठाकुर हिने केले. या कार्यक्रमात राजपुत समाज बांधव उपस्थित होते.आणि कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या