🌟परभणी जिल्हा पोलिस दलातील कर्तबगार पोलीस कर्मचारी तथा पुर्णा नगरीचे भुमीपुत्र शब्बीर खान पठाण यांना पदोन्नती....!


🌟जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांच्या हस्ते शब्बीर पठाण यांना सहा.पोलीस उपनिरीक्षक पदाचे नियुक्तीपत्र बहाल🌟 

परभणी (दि.१५ जुन २०२४) - परभणी जिल्हा पोलिस दलातील कर्तबगार पोलिस कर्मचारी तथा पुर्णा नगरीचे भुमीपुत्र तथा मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व शब्बीर खान पठाण यांना परभणी जिल्ह्याचे सन्माननीय कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी पदोन्नती बहाल केली असून जिल्हा पोलिस अधिक्षक श्री परदेशी यांनी नुकतेच शब्बीर खान पठान यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्तीपत्र बहाल केले आहे.

पुर्णेचे भुमीपुत्र शब्बीर खान पठाण यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून मिळालेल्या पदोन्नतीबद्दल त्यांचे मा.नगराध्यक्ष हाजी साहेब कुरेशी,नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष एकलारे,नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,मा.नगरसेवक चांद साहाब बागवान,जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड सर,शाहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा अजित न्युज हेडलाईन्स वेबवृत वाहिनीचे संचालक/संपादक चौधरी दिनेश, सामाजिक कार्यकर्ते राजु नारायणकर,पत्रकार मो.अनिस बाबुमियां, पत्रकार मुजीब कुरेशी,सामाजिक कार्यकर्ते इश्यू पठाण यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या