🌟पाऊले चालती पंढरीची वाट...पंढरपूर येथील विठ्ठलाच्या भेटीला निघाला श्री संत गजानन महाराज भक्तांसह पालखी सोहळा....!


🌟श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे मालेगाव शहरात उत्साहात स्वागत🌟


फुलचंद भगत

वाशिम:-पंढरपूर येथील विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे मालेगाव नगरीत आगमन होताच भक्तांकडून पालखी मार्गावर सडा,रांगोळी,स्वागत कमानी उभारुन जल्लोषात स्वागत करण्यात आले.


 श्री च्या पालखीचे वारकर्‍यासह वाशीम जिल्ह्यातील  शहरात २० जून रोजी आगमत झाले मंगलवाद्याच्या गजरात सोबत पांढर्‍या पोशाखातील वारकरी हातात भगवे ध्वज घेऊन टाळ मृदंगाच्या तालावर श्री चा जयघोष करीत होते पालखी समोर दोन अश्व होते श्री च्या पालखीचे २० जून रोजी पहाटेला आगमन होताच श्रीच्या भक्तांनी थाटात पुजन करून हर्षोल्हासात भक्तिमय वातावरणात स्वागत केले. श्री चा पालखी सोहळा विश्वमंदीर श्री नंगेनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र डव्हा नगरीत नाथांच्या दरबारात मुक्काम करून २० जून रोजी शहरात आगमन झाले. शहरातील पंचायत समिती प्रांगणात श्री चे पालखीची पुजा अर्चाना करून शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी येथे दर्शनाचा लाभ घेतला पालखी सोहळ्यातील समस्त वारकरी भक्तांना पंचायत समितीच्या भव्य प्रांगणात फराळ व चहापाण्याची सोय केली होती. 

शहरातील आबाल वृद्धासह बाल गोपालांच्या गर्दीने परिसर फुलला होता त्यानंतर श्री ची पालखी नगरपंचायत कार्यालय समोर  मुख्य अधिकारी निलेश गायकवाड यांनी स्वतः पालखीतील वारकऱ्यांना बिस्किटाचे वाटप करण्यात आले यावेळी नगरपंचायत चे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा दोन्ही बाजूला स्टॉल लावून तिथे बिस्कीट पुडेचे वाटप केले शहरातील मुख्यमार्गावरून शिव चौक,गांधी चौक,डॉक्टर चव्हाण यांच्या दवाखान्यासमोरून,डॉक्टर जोगदंड हॉस्पिटल,ते माहेश्वरी भवनात पोहोचली येथे शहरातील मुंदडा कुटूंब (पळशीवाले) यांचे तर्फे पालखीतील सर्व वारकरी मंडळीसह भक्ताना नेहमी प्रमाणे भोजनाची व्यवस्था केली होती शहरवासीयांनी ठिकठिकाणी वारकर्‍यांना साबण, बिस्किट, फराळी पाकीट वाटप करून पालखी मार्गावर थंड पाण्याची तर शरबतची सोय केली होती श्री च्या पालखीतील मुर्तीचे दर्शनासाठी शहरासह परिसरातील भाविकांनी गर्दि केली होती गण गण गणात बोतेच्या जय घोषाने मालेगाव नगरी भक्तिमय झाली होती दुपारनंतर श्री चे पालखी शिरपूरकडे प्रस्थान झाले शिरपूर येथील मुक्कामानंतर उद्या २१ जून रोजी पालखी पुढील मार्गासाठी प्रस्थान करणार आहे.

2019 पासून पालखीचा शहरातून जाण्याच्या मार्ग हा शहरातील गांधी चौक पासून ते पुरातन काळातील प्रसिद्ध असलेले मारुतीच्या मंदिर समोरून ही पालखी गावातील जैन मंदिर समोरून तसेच दुर्गा चौक येथून माहेश्वरी भवन कडे जात असते परंतु या कोरोना महामारी पासून ही पालखी गावातून येणे बंद झाल्यामुळे भावी भक्तांमध्ये खूप नाराजी व्यक्त केल्या जात आहे, पुढील वर्षी पासून पूर्वापार मार्गाने पालखी शहरातून जावी अशी भाविकांची मागणी आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या