🌟परभणी तालुक्यातील धर्मपुरी येथील ज्ञानसाधना परीक्षा केंद्रावर गैरप्रकार ? टायपिंग परीक्षार्थींचे मोठे नुकसान....!

🌟आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे केली आयुक्त महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत तक्रार🌟 


परभणी :- मागील दोन-तीन दिवसांपासून ज्ञानसाधना फार्मसी कॉलेज धर्मपुरी या परीक्षा केंद्रांवर टायपिंग ची परीक्षा चालू होती काल दिनांक 18 जून मंगळवार रोजी विद्यार्थ्यांना या केंद्रावर अनेक अडचणी आल्याची तक्रार आम आदमी पार्टी परभणी कडे करण्यात आली जिल्हाध्यक्ष सतीश चकोर व त्यांची सर्व टीम यांनी सदर परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता अनेक तक्रारींचा पाढा विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर वाचून दाखवला त्यामध्ये मुख्यतः पेपर देताना लॉगिन होण्यास अडचणी येत होत्या तसेच मराठी टायपिंग चा पेपर असतानाही फक्त इंग्लिश टायपिंग उपलब्ध होत होती अनेक विद्यार्थ्यांना कीबोर्ड अचानक चालत नसल्याकारणाने शेवटचे तीन ते चार मिनिटे टायपिंग न करताच पेपर सबमिट होत असल्याचे सांगितले सदर प्रकार विद्यार्थ्यांनी ड्युटी वर असलेल्या शिक्षकांना कळविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी विद्यार्थ्यांची अडचण दूर करायची सोडून त्यांनाच दमदाटी केली या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी येऊन ऐकताहेत आणि फेसबुक लाईव्ह करतायेत म्हटल्यानंतर केंद्र चालकांनी ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना पाच वाजता वेगळ्या बॅच मध्ये आत मध्ये घेऊन त्यांची आम्ही व्यवस्थित एक्झाम घेऊ असे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितले त्यानंतर पार्टीचे पदाधिकारी काही अंतरावर जाऊन बसले आणि सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान याच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजनल हॉल तिकीट जमा करून घेऊन सोडून देण्यात आले आणि त्यांचे कुठलेही परत लॉगिन करण्यात नाही आलं त्यांचं जी तक्रार होती ती सोडवण्यात नाही आली परत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी जेव्हा केंद्रावर गेले त्यावेळी केंद्र चालक श्री कंठाळे हे प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत होते परंतु पदाधिकाऱ्यांनी त्यांना गाठून फेसबुक लाईव्ह द्वारे त्यांना जाब विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितले की पाच वाजता ज्या मुलांना परत आत घेतलं होतं त्यांची कुणाचीही परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर्वर डाऊन आहे आम्ही सॉफ्टवेअर कंपनीला या मुलांच्या तक्रारी पाठवून दिलेले आहेत ते काय म्हणतात आणि पुढे कधी परीक्षा घ्यायची ते सांगितल्यानंतर आम्ही त्यांची एक्झाम घेऊ.

 एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता शेवटी अनेक मुलांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या विद्यार्थ्यांनी तिथे आर्थिक व्यवहार केला त्यांचे एक्झाम व्यवस्थित कंडक्ट करण्यात आल्या उलट अनेक डमी उमेदवार देऊन त्यांच्या एक्झाम घेण्यात आल्या परंतु ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यांनाच या अडचणी आलेले आहेत त्यांची बसण्याची वेगळ्या हॉलमध्ये व्यवस्था होती तसेच परत सगळ्या परीक्षार्थींना त्यांच्या बैठक क्रमांकानुसार बसवण्यात न येता ज्यांनी पैसे दिले त्यांना वेगळ्या हॉलमध्ये आणि ज्यांनी नाही दिले त्यांना वेगळे हॉलमध्ये बसविण्यात आले आणि ज्यांनी नाही दिले त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते त्यांचे अडचणी दूर केल्या जात नव्हत्या असे खळबळ जनक आरोप परीक्षार्थीनी ज्ञानसाधना फार्मसी कॉलेज या परीक्षा केंद्राबद्दल केले आहेत या सर्व तक्रारी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर हे स्वतः आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे पाठपुरावा करून त्या विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान व त्यांच्या परत परीक्षा घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. यावेळी सोबत अनिल देशमुख, कल्याण क्षीरसागर, प्रल्हाद झाडे, बाळासाहेब साळवे, एकनाथ जगाडे, माऊली झाडे, आकाश शिंदे व इतर पदाधिकारी सोबत होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या