🌟उमरी कृषीपंपासाठी विद्युत प्रवाह थ्रीफेज अठरा तास चालू करा अन्यथा महावितरण कार्यालयास टाळे ठोकू....!


🌟शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मा.तालुका प्रमुख साहेबराव पाटील शिंदे यांचा इशारा🌟 

नांदेड/उमरी ( प्रतिनिधी ) - नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या मौ.हिरडगाव येथिल ऊसाचे पिक असल्यांने सध्या शेवटचे ईसापूर धरणातील पाणी पाळी सुटल्याने व सुर्य आता आग ओकत असून उन्हाची तिव्रता मोठ्या प्रमाणात असल्यांने शेतातील शेतक-यांचे उभे असलेले ऊसाचे पिक होरपळून व करपून जात असल्यामूळे  शेतक-यांना ऊसाच्या पिकांचे नुकसान पाहावत नसल्याने थेट शेतकरी  महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता महानूर यांच्याकडे निवेदन सादर  करुन तातडिने कृषीपंप अधिक चा वेळ वाढवून अठरा तास कृषी पंप चालवण्यासाठी थ्री फेज विद्युत प्रवाह चालू करुन आम्हा शेतक-यांना ऊस पिकांना जिवदान द्यावे अशी विनंती शेतक-यांच्या वतीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे साहेबराव पाटील शिंदे माजी तालुकाप्रमुख तथा समन्वय समिती तालुकाध्यक्ष यांनी संबधित नांदेडचे सुप्रिटेंड ईंजनिअर जाधव व भोकर कार्यकारी अभियंता चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधले आहे . शेतक-यांची हाल अपेष्टा कथन करून महावितरण कार्यालयाकडून होत असलेल्या विद्युत प्रवाह खंडित होऊन शेतक-यांना हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे महवितरण कंपनीने झालेल्या ऊस पिकांचे नुकसान भरपाई द्यावे  किंवा तातडीने महावितरणने अठरा तास कृषी पंपासाठी विद्युत प्रवाह चालू करा अन्येथा महावितरण कार्यालयास टाळे ठोकू यावेळी शिवसेना (उ.बा.ठा.)गटाचे साहेबराव पाटील शिंदे माजी तालुकाप्रमुख तथा समन्वय समिती तालुकाध्यक्ष, यावेळी नरसिंगराव मुक्कावार,गोविंद पाटील भुजबळे,जनार्दन भुजबळे,चंद्रकांत भुजबळे,सचिन भुजबळे,माणिक भुजबळे,बालाजी भूजबळे मोठ्या प्रमाणात आदी शेतकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या