🌟नीट परीक्षा घोटाळ्याची चौकशी करा : उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.....!


🌟परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली मागणी🌟


नीट परीक्षेचा निकाल 4 जून रोजी घोषित झाला. यात काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या -

• 67 विद्यार्थांना 720 पैकी 720 मार्क्स पडले आहेत. प्रतिवर्षी सिंगल फिगर मध्ये ही संख्या असते. 

• हरियाणा मध्ये एकाच केंद्रात 7 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क कसे मिळू शकतात ?

• उत्तर वगळले तर 4 गुण कमी होतात व चुकीचं उत्तर दिल्यास 5 गुण कमी होतात. असे असेल तर 717, 718 किंवा 719 एवढे मार्क्स पडणे शक्य आहे काय?

• 14 जूनचा निकाल निवडणूक निकालांच्या वातावरणात 4 जूनलाच कशासाठी ?

या गोंधळामुळे दहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या! त्याची जबाबदारी कोणावर? विद्यार्थ्यांच्या मनाशी, त्यांच्या भवितव्याशी अजून किती खेळायचंय? या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी नीट परीक्षा 2024 मधील झालेल्या घोटाळ्याची व जबाबदार नॅशनल टॅलेंट एजन्सीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आज विद्यार्थी, पालक व शिक्षकांसमवेत परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली.

या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. अन्यथा या विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतिहासात झाले नाही, असे आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. या विद्यार्थ्यांना कोणीही नाही, असे समजू नका. सरकारकडून या आत्महत्यांचा हिशोब घेऊ......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या