🌟आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पूर,विज,आग,भूकंप,सर्पदंश,रस्ते अपघात याविषयी एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न....!


🌟वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसिल कार्यालयाचे आयोजन🌟


फुलचंद भगत

वाशिम :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम,NDRF नागपूर व तहसील कार्यालय,मालेगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि.२० जुन २०२४ रोजी स्थळ तहसील कार्यालय मालेगाव येथे मा.बुवनेश्वरी एस.भाप्रसे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,वाशिम यांचे आदेशानुसार व मा.श्री विश्वनाथ वि.घुगे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम यांचे सूचनेनुसार तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन पूर, विज, आग, रस्ते अपघात, सर्पदंश या विषयी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन मालेगाव येथे करण्यात आले आहे.


सदर प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी मालेगाव नायब तहसीलदार मा. रंजना गोरे ह्या होत्या.सदर प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, नायब तहसीलदार श्री रवि भांबड, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,नागपूरचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक श्री जयस्वाल व सर्व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल टीम , तालुका कृषी अधिकारी मालेगाव श्री देवकर हे उपस्थित होते.

                  यावेळी मार्गदर्शन शाहू भगत, नायब तहसीलदार श्री रवि भांबड,ब्रिजेश कुमार यादव,Ndrf टीम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर प्रशिक्षणाला सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक/सेविका, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर व विविध विभागाचे कर्मचारी,तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.प्रशिक्षण यशस्वीतेसाठी श्री खुळे, श्री गणेश चौके व इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन श्री खुळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या