🌟परळी नगर परिषदेने वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची घेतली तात्काळ दखल.....!

🌟शहरातील मागासवर्गीय स्मशानभूमीतील लाईटांच्या दुरुस्तीचे काम केले सुरू : बाळासाहेब जगतकर यांच्या प्रयत्नांना यश🌟                  

परळी (दि.१३ जुन २०२४)-- वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल घेऊन नगरपालिकेने तात्काळ परळी शहरातील दलितांच्या स्मशानभूमी मधील लाईट चालू करून देत असताना ची माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर येथील शांतीवन स्मशानभूमीतील लाईट व्यवस्था चालू करण्यात यावी जगतकर गल्ली येथील पडलेला खड्डा दुरुस्त करण्यात यावा व शंकर साळवे ते सखाराम जगतकर व कुमार जगतकर यांच्या घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा प्रकारचे लेखी निवेदन परळी नगरपालिकेला दिनांक 10 6 2024 रोजी दिले असता त्याची दखल म्हणून आज दिनांक 13 6 2024 रोजी परळी नगरपालिकेने दलितांच्या स्मशानभूमी मधील लाईट चालू करण्याच्या कामाची सुरुवात केली असून लवकरच जगतकर गल्ली येथील खड्डा ही बुजवण्यात येणार असून पाईपलाईन ही टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या