🌟परभणी जिल्हा पोलिस दलांतर्गत पोलिस भरती प्रक्रियेत चौथ्या दिवशी ६०१ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र...!


🌟अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे🌟 

परभणी : परभणी जिल्हा पोलिस दलांतर्गत पोलिस शिपाई व चालक या दोन पदांसाठीच्या भरती प्रक्रियेत शनिवार दि.२२ जुन २०२४ रोजी चौथ्या दिवशी ६०१ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र तर २ उमेदवारांना पुढील तारीख देण्यात आली.

         परभणी जिल्हा पोलीस दलांतर्गत शिपाई पदाच्या १११ जागांकरीता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत क्रीडा संकुलात भरती प्रक्रिया सुरु झाली असून या भरती प्रक्रियेकरीता चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारी १००१ उमेदवार बोलावण्यात आले होते. त्यापैकी ६९७ उमेदवार हजर झाले त्यातून ६०१ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र झाले तर २ उमेदवारांना पुढील तारीख देण्यात आली अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या