🌟परभणी जिल्ह्यातील पालम मध्ये ओबीसी समाजाकडून कडकडीत बंद....!


🌟जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीतील प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंबा🌟

🌟 पालम तहसीलदारांना देण्यात आले निवेदन🌟

परभणी (दि.21 जुन 2024) : ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मणराव हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ  सकल ओबीसी समाजाच्या वतीने  शुक्रवारी (दि.21) पालम तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला.

       वडीगोद्री (जि.जालना) येथील उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला 9 दिवस लोटले आहेत. त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असताना देखील राज्य शासनाने उपोषणकर्त्यांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पालम तालुका बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळपासूनच पालम शहरातील बाजारपेठ उघडली नव्हती. व्यापार्‍यांनी देखील बंदमध्ये सहभाग नोंदवून आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली. परिणामी, शहरात शुकशुकाट पहावयास मिळाला. पालमसह तालुक्यातील पेठशिवनी, चाटोरी, बनवस येथील व्यापारी प्रतिष्ठाने देखील उघडली नव्हती. ओबीसी समाज बांधवांद्वारे पालम तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

दरम्यान,  सकाळी तालुक्यातील ओबीसी समाज पेठशिवनी येथे एकत्र आला. येथून सकल ओबीसी समाजाने जवळपास 100 वाहनांचा ताफा पालम येथे नेऊन वडीगोद्री येथील उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीने उपोषणाला पाठिंबा देत असल्याचे ठरावपत्र सादर केले. त्यानंतर सर्व वाहने वडीगोद्रीकडे रवाना झाली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या