🌟मराठवाडा एक्सप्रेस जालना ते मनमाड दरम्यान व मनमाड ते औरंगाबाद दरम्यान ११ जुन पर्यंत अंशतः रद्द....!


🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने कळवली आहे 🌟

नांदेड (दि.०७ जुन २०२४) : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत नांदेड विभागातील रोलिंग कोरिडोअर ब्लॉकमुळे धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस जालना ते मनमाड दरम्यान आणि मनमाड ते औरंगाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

             आज शुक्रवार दि.०७ जून पासून १७६८८ धर्माबाद-मनमाड एक्सप्रेस ११ जून पर्यंत जालना ते मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली आहेत. तर १७६८७ मनमाड-धर्माबाद ११ जून पर्यंत मनमाड ते औरंगाबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. दरम्यान नांदेड ते निजामुद्दीन १२७५३ ही रेल्वे गाडी या कालावधीत उशीराने धावणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या