🌟परभणीत जागतिक दूध दिना निमीत्त जनजागृती अभियान.....!


 🌟या अभियानांतर्गत २०० ते २५० जणांना दूध सेवनाचे फायदे दुधाचे गुणधर्म या संदर्भात माहिती देण्यात आली🌟 

 परभणी (दि.०२ जुन २०२४) : जागतिक दुध दिनानिमित्त शनिवार ०१ जून २०२४ रोजी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर अंतर्गत येणार्‍या पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय परभणीच्या वतीने कृषी विद्यापीठामध्ये सकाळी व्यायाम करण्यासाठी येणार्‍या जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर दुध सेवना संदर्भात जनजागृती अभियान सकाळी ०६.०० ते ०८.०० या वेळेत राबविण्यात आले.

             या अभियानांतर्गत २०० ते २५० जणांना दूध सेवनाचे फायदे,दुधाचे गुणधर्म तसेच विद्यापीठामार्फत राबविण्यात येणार्‍या दुधासंदर्भातीलीत विविध उपक्रमाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. डॉ. अनिल भिकाणे, संचालक, विस्तार शिक्षण, मपमविवि, नागपूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विशेष उपक्रमच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुधीर राजूरकर, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संजय लोंढे, कार्यक्रम अधिकारी, डॉ. संदीप रिंढे तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. सचिन भुसे, डॉ. लक्ष्मीकांत गट्टेवाड आणि डॉ. संकेत भदुले यांनी मेहनत घेतली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या