🌟परभणी जिल्ह्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु.....!


🌟वस्तीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन🌟

परभणी (दि.13 जुन 2024) : समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह, परभणी, मानवत, सेलू व पुर्णा येथे प्रत्येकी एक तसेच मुलींचे वरील चारशिवाय गंगाखेड येथील एक अशा एकूण ९ शासकीय वसतिगृहामध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्याृमुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.

यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, अकरावी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणा-या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे.गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्याच्या वसतिगृहाकडे सादर करावेत. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा (०२४५२-२२०५९५) दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, परभणी श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या