🌟गोमाता व गोवंश कत्तल रोखण्यासाठी हिंदुराष्ट्र सेनेचे वतीने चिखली पोलीस स्टेशनमध्ये निवेदन.....!


🌟निवेदन देताना यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख विजय पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

✍️ मोहन चौकेकर 

चिखली : गोवंशाची वाढती चोरी तसेच गव गोमाता व गोवंश यांची निर्घृण पणे होत असलेली कत्तल तसेच बकरी  ईद चे काळात याचे वाढणारे  प्रमाण लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हे प्रकार रोखावे या साठी हिंदुराष्ट्र सेनेने चिखली पोलीस स्टेशनमध्ये दि.१५ जुन रोजी निवेदन दिले आहे.

आमचा कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही समाजाला विरोध नसून आमच्या धार्मिक भावनेचा विचार करावा असे या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . निवेदन देताना यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख विजय पवार, गुरुद्वारा दशमेश दरबारचे अध्यक्ष तथा हिंदुराष्ट्र सेनेचे उपाध्यक्ष असलेले राकेश चोपडा,वारकरी संप्रदायाचे ह भ प किरण महाराज शिंदे, ह भ प गजानन महाराज ठेंग शास्त्री ,ह भ प विठ्ठल महाराज साठे ,हिंदुराष्ट्र सेना चिखली शहर प्रमुख हरिहर सोळंकी ,राकेश इघवे , विलास पाटील, जयवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या