🌟विरशैव लिंगायत प्रतिष्ठान वतीने विनायक भोजने यांचा वाढदिवस निमित्त वृक्ष लागवड करून संगोपन केले....!


🌟यावेळी वीरशैव  लिंगायत प्रतिष्ठानचे बहुसंख्येने सदस्य उपस्थित होते🌟

परभणी - नांदापूर येथील वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मदन लांडगे यांच्या शेतात प्रतिष्ठानचे सदस्य व मित्र परिवार  यांचे वाढदिवस झाडे लावून व वाढलेल्या झाडाचे संगोपन करून वाढदिवस साजरा केला जातो.

आजच्या काळात  केक कापून व इतर खर्च करून वाढदिवस साजरा केला जातो ते न करता प्रतिष्ठानच्या वतीने आजच्या काळाची गरज म्हणून  झाडे लावा झाडे जगवा या उद्देशाने समाजात जागरूकता आणण्यासाठी  संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मदन लांडगे यांच्या संकल्पनेतून मित्राचे व प्रतिष्ठानचे सदस्यांचे वाढदिवस झाडे लावून व झाडाची संगोपन करून केले जातात.

मागील पाच वर्षापासून हा उपक्रम चालू असून तो सातत्याने डॉक्टर मदन लांडगे साहेब यांनी चालू ठेवला आहे याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठान ची सदस्य व आमचे मित्र मांडवा येथील पोलीस पाटील शिवानंद भोजने यांचे लहान भाऊ विनायक भोजने यांच्या वाढदिवसानिमित्त नांदापूर येथे डॉक्टर मदन लांडगे साहेब यांच्या शेतात झाडाचे संगोपन करण्यात आले .

यावेळी वीरशैव  लिंगायत प्रतिष्ठानचे बहुसंख्येने सदस्य उपस्थित होते व  तसेच नांदापूर येथील संदीप रसाळ, राजू अंभोरे, गजानन गिरी ,संतोष लांडगे, महेंद्र लांडगे आदींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या