🌟आषाढी एकादशीनिमित्त दररोज तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी.....!


🌟मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच्याकडे केली मागणी🌟                                   

परभणी (दि.18 जुन 2024) :- आषाढी एकादशीनिमित्त दिनांक 12 जुलै ते 22 जुलै 24  दरम्यान  मराठवाड्यातून तीन विशेष रेल्वे गाड्या  दररोज पंढरपूरला सोडण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे                             

या संदर्भात एक निवेदन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या मुख्य प्रबंधक नीती सरकार यांना देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त मराठवाड्यातून लाखो भाविक पंढरपूर येथे जात असतात. या वर्षी दिनांक 12 जुलै ते 22 दरम्यान 24 जुलै दरम्यान हा यात्रा महोत्सव आहे. या  काळात औरंगाबाद ते पंढरपूर, अकोला ते पंढरपूर  आणि आदीलाबाद ते पंढरपूर अशा तीन रेल्वे गाड्या दररोज लातूर कुर्डूवाडी मार्गे चालवण्यात याव्या तसेच या काळात निजामाबाद- पंढरपूर या  रोज धावणाऱ्या  गाडीला पाच अतिरिक्त डबे जोडण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज,प्रा. सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, डॉ. राजगोपाल कलानी, रितेश जैन ,बाळासाहेब देशमुख, विठ्ठल काळे, माणिक शिंदे बलसेकर, कदीर लाला हाश्मी ,रुस्तुम कदम,  दयानंद दीक्षित ,श्रीकांत गडप्पा , हभप गिरी महाराज आदींनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या