🌟कोरडवाहू परिस्थितीसाठी कापूस पिकाचे सघन लागवड तंत्रज्ञान फायदेशीर - डॉ.गजानन गडदे


🌟परभणी तालुक्यातील सोन्ना येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शक कार्यशाळेत बोलताना ते म्हणाले🌟


परभणी :- माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील शास्त्रज्ञांनी सोन्ना  ता. परभणी येथे 12 जून रोजी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ.गजानन गडदे यांनी महिलां शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस लागवड तंत्रज्ञान याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.यामध्ये विद्यापीठांनी विकसित केलेले  सोयाबीन पिकाचे एमएयुएस 612, एमएयुएस 725 ,एमएयुएस 158 किंवा ज्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे सोयाबीन काढायचे आहे त्यांनी एमएयुएस 162 या  वाणाची लागवड करण्याचे तसेच लागवडीपूर्वी बुरशीनाशक, कीटकनाशक व जैविक संवर्धनाची बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन केले.

 तसेच कोरडवाहू परिस्थितीसाठी कापूस पिकाचे सघन लागवड तंत्रज्ञान अधिक फायदेशीर  असल्याचे नमूद केले कारण या तंत्रज्ञानामध्ये हेक्टरी झाडांची संख्या दुप्पट असल्यामुळे उत्पादनात वाढ होते.डॉ.डी डी पटाईत यांनी सोयाबीन व कापूस पिकावरील येणाऱ्या संभाव्य कीड व रोग  बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती  केंद्राचे श्री एम बी मांडगे, श्री नितीन मोहिते, रिलायन्स फाउंडेशनचे श्री रामा राऊत व नितीन कोल्हे तसेच महिला आर्थिक विकास महामंडळच्या गंगुताई भालेराव यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या